महिला राज मध्ये चांद्याचे विकास कामे गतिमान

सरपंच सुनंदा ताई दहातोंडे आणि उपसरपंच वर्षाताई जावळे यांच्या पुढाकाराने विविध विकास कामांना सुरवात ...


प्रतिनिधी. सचिन म्हस्के चांदा

विकास कामांची माहीती देताना सरपंच यांनी पुढील माहिती दिली.नोबेल हॉस्पिटल ने चांदा गाव दत्तक घेऊन जीवनदायिनी योजना अंतर्गत 3500 हजार कुटूंबाना आरोग्य कार्ड चे वाटप करण्यात आले . तसेच आरोग्यातील दुसरी सुविधा अभाकार्ड चे ही वाटप करण्यात आले .वेगवेगळे आरोग्य मार्गदर्शक शिबिरे घेतली गेली .महिला दिनानिमित्त महिलांच्या सर्वांगीण विकासा साठी i love nagr च्या मार्फत महिलाचा सम्मान करण्यात आला .तसेच रस्त्याचे बाजूचे धोकादायक काट्या झाडांच्या फांद्या साफसफाई केल्या गेल्या .दलित वस्ती (अल्पसंख्याक ) वस्ती वर पिण्याची पाण्याची व्यवस्था केली .छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम ही होत आलेले आहे .सर्व अंगणवाड्याना लाईट देण्यासाठी प्रस्थाव टाकला आहे .



थोरात नगर येथे भूमिगत गटार योजना पूर्ण केली .पाण्याची टाकी च्या बाजूला अतिक्रमण होऊ नये या साठी बाजूने सरंक्षण भीत बांधणे साठी ठराव मंजूर केले .दत्त मंदिर भुयारी गटार योजना पूर्ण केली . फकिरवाडी शाळेस सरंक्षण भिंत पूर्ण झाली .अमर धाम येथे नविन शवदाहिनी बसवण्यात आली.नदी स्वच्छता आणि सुशोभीकरण करणं चे काम लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.पांनाद रॉड ला मान्यता मिळाली आहे.ज्यांना रेशन धान्य मिळत नाही अश्या एकूण 700 कुटुंबाचे नव्याने ठराव पाठवण्यात आले आहे .यामुळे अजिंक्य भारत या वृत्तपत्रा ,ने पुरस्कार देऊन सम्मान केला . गारपीट वादळी वारा यामुळे नुकसान झालेल्या शेतकरी यांचे शासकीय लाभ देणेकामी महसूल विभागासोबत फॉर्म भरून देण्यास सहकार्य केले .महिला आर्थिक विकास महामंडळ तर्फ निरधुर चुली चा सर्व करून व काहींना त्या वाटप ही करण्यात आल्या. महिला बचत गटाची कर्ज व अनुदान प्रस्ताव मंजूर करून घेतले व काही प्रस्ताव दाखल आहे .घरकुल योजने मध्ये 2010 पासून बंद पडलेली एकूण 23 घरकुल सुरू करून पूर्णत्वास नेले व या वर्षात सर्वात जास्त घरकूल हे चांदा ग्रामपंचायत ने पूर्ण केले..चांदा रस्तापुर हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग दुरुस्तीसाठी पाठवुरावा करून पूर्णत्वास नेला .जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात शुद्ध पाणी देण्यासाठी शासनाकडून 13 कोटींची योजना मंजूर करण्यात आली .तसेच गावासाठी वाचनालय , सांस्कृतिक साहित्य मंच , क्रीडा मैदान ,नाना नाणी पार्क , गावतील चौक यांना महापुरुषांची नावे , ठीक ठिकाणी बसण्यासाठी बाकडे , वृक्षारोपण , गाव सुशोभीकरण यांचे ही प्रस्ताव येणाऱ्या ग्रामसभेत मांडून लवकरच ते काम ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे .