ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची नेपाळ मधे कराटे व फुटबॉल स्पर्धेत गगन भरारी...




बागलाण प्रतिनिधी | आकाश साळुंके 

         दि.22 एप्रिल नेपाळ मधील पोखरा येथे घेण्यात आलेल्या पाचव्या इंडो नेपाळ आंतरराष्ट्रीय चँम्पियनशिप स्पर्धेत ग्रामिण भागातील व मोसम पट्यातिल नामपूर व द्याने येथील सहा चिमुकल्यांनी  फुटबाँल व कराटे स्पर्धेत मोठे यश मिळविले या सहाही चिमुकल्यांचा गुणगौरव नामपूर येथील श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठाण संस्थेच्या वतिने करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे शरद नेरकर होते. त्यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की ग्रामिण विद्यार्थांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील यश कौतुकास्पद असून विद्यार्थांचे भवितव्य क्रिडास्पर्धा खचितच बदलवू शकतात.
     या सहाही  चिमुकल्यांचं  वय अवघे ११ वर्ष असून सर्व गुणवंत विद्यार्थीं शेतकरी कुटुंबातील आहेत. 
या गुणवंत गुणगौरव पुरस्कार सोहळ्यास संतोष सावंत , सचिन कंकरेज ,शरद नेरकर,किरण वाघ ,प्रभाकर पाटील,सतिश कापडणीस ,गुलाब कापडणीस,अशोक कापडणीस  कैलास वाघ , तात्यासाहेब पाटील. देविदास पगार, विठ्ठल मगजी,शरद कोकणे,अशोक भामरे ई. पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

पुरस्कारार्थी :- 
१) शौर्य रविशेखर वाघ  २)आश्विन किरण वाघ ३)ओम प्रकाश पवार ४)आदित्य पोपट जाधव ५)ज्ञानेश महेश खैरणार ६) सुधिक्षा महेश खैरणार ७ ) संस्कृति योगेश कोकणे