गोरेगाव (माणगाव) बाजारपेठेत रस्ता कामामुळे वाहतूक कोंडी



सूर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी 
       माणगाव (रायगड) तालुक्यातील गोरेगाव बाजारपेठेत संत रोहिदास नगर प्रवेशद्वारा समोरच रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी होत असून वाहनचालकांसह ये-जा करणार्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.
     हा मार्ग मुंबई गोवा महामार्गावरुन गोरेगाव ते श्रीवर्धन, हरिहरेश्व, म्हसळा असा असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यातच या रस्ता कामासाठी एकाच वेळी दोन जेसीबी आणी एक ट्रँक्टर रस्त्यावर वापरण्यात येत असल्याने मार्ग बःदिस्त होत आहे. 


       बाजारपेठेतच हे काम सूरु असल्याने नागरिकाःची मोठी गैरसोय होत असून वाहनकोंडीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान संबधित बांधकाम विभागाने या कडे लक्ष देत नागरिकाःची होणारी गैरसोय सोडवण्यावर लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.