तळा तालुक्यातील साईराज, विशाल, स्मिता यांची रायगड पोलीस दलात निवड

प्रतिनिधी सुरज पुरारकर

तळा - महाराष्ट्र राज्य पोलीस भरती परीक्षेत तळा तालुक्यातील तिघांची निवड.2021मधील पोलीस भरती मध्ये तालुक्यातील साईराज जयंत लिमकर,रोवळा येथून विशाल विठोबा घाडगे आणि गिरणे येथून स्मिता सचिन नाक्ती या तिघांनी गरीब घरातून येऊन मेहनतीने कष्टाने आणि आपल्या जिद्दिवर यश संपादन केले असून या तिघांनी भरती मध्ये निवड होण्याकरिता अफाट परिश्रम घेतले. अतिशय मेहनत घेऊन आपल्या घरातल्यांची स्वप्न उराशी बाळगून त्यांनी ही परीक्षा सर केली असून साईराज लीमकर याने मैदानी परीक्षेत 50पैकी 45 गुण आणि लेखी परीक्षेत 100पैकी 93 गुण मिळवले असून विशाल घाडगे याने मैदानी परीक्षेत 50पैकी 41गुण तर लेखी परीक्षेत 100पैकी 82 गुण मिळवले तर स्मिता नाक्ती हिने मैदानी परीक्षेत 50पैकी 45गुण तर लेखी परीक्षेत 100 पैकी 73 गुण मिळवून घव घवित यश संपादन केले

    तिघांनी मिळवलेल्या यशस्वी कामगिरी बद्दल तालुक्यातून नव्हे तर सर्व स्थरावरून अभिनंदनाच्या शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.