शेळगाव विकास सोसायटीच्या चेअरमनपदी परमेश्वर राजपुत तर व्हा.चेअरमनपदी भागवत झटकवडे याची बिनविरोध निवड.


 शिवाजी  जाधव जामनेर तालुका  प्रतिनिधी 

जामनेर तालुक्यातील शेळगाव येथील विकास सोसायटीच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवड झाली असून आज रोजी नवनियुक्त संचालक मंडळाची चेअरमन व्हा.चेअरमन निवडीची सभा अध्यासी अधिकारी एस.एस.पवारसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन  चेअरमनपदी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व माजी सरपंच परमेश्वर राजपुत तर व्हा.चेअरमनपदी भागवत झटकवडे याची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी त्याचा सत्कार उपसरपंच निळकंठ पाटील यांनी केला यावेळी नवनियुक्त संचालक संतोष पाटील,हिम्मत राजपुत,सोपान धनोई,संजय बावस्कर,योगेश राजपुत,विठ्ठल सपकाळ,सोपान पाटील,मंगलाबाई परदेशी,लताबाई पायघोन,निवृत्ती डोळसे आदी उपस्थित होते.मिटींगचे कामकाज सचिव अनिल पाटील यांनी पाहीले त्यांना शिपाई काशिनाथ सुर्यवंशी यांनी मदत केली.यावेळी चेअरमन,व्हा.चेअरमन याचे तळेगांवचे माजी सरपंच राजुशेठ,सोपान धनोई यांनी अभिनंदन केले.