डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन

 


सोयगाव प्रतिनिधी..  रईस शेख

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुपारी चार वाजता ट्रॅक्टर मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवून मिरवणुकीला सुरुवात झाली सावळदबारा गावातील विविध ठिकाणी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने आदर्श युक्त व शांततेस साजरा करण्यात आला मिरवणुकीत गावातील महिला भगिनींनी व परिसरातील गावचे सरपंच उपसरपंच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी समाज बांधवासह धम्म वंदना घेऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मिरवणूकीत ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पूजन करून  अभिवादन करण्यात आले