सोयगाव प्रतिनिधी रईस शेख
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे आनंदाचा शिधा वाटपला सुरुवात राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्या गुढीवाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तआनंदाचाशिधा वाटप करण्याचे निर्देश शासनाने केले होते. त्यानुसार आज एप्रील रोजी येथील रेशन दुकानदार वैभव गोंडबे यांनी चालविलेल्या स्वस्तधान्य दुकानात प्रमुख मान्यवराच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण करण्यात आले. जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण संस्थेअंतर्गत अत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच शेतकरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक किलो प्रमाणे रवा, चणादाळ, साखर, व पामतेल असा शिधा देण्यात येणार आहे. गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा लाभार्थीना नाममात्र शंभर रुपये घेवून या सवलतीच्या दराने वितरीत करण्यास सुरुवात झाली आहे.
सावळदबारा गावातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून आनंदाचा शिधा सरपंच शिवाआप्पा चोपडे, उपसरपंच मो मो.आरिफ लुखमान व पत्रकार बंन्धू यांच्या हस्ते वितरणाला सुरुवात करण्यात आली. यामध्ये अत्योंदय, प्राधान्य कुटूंब, व शेतकऱ्यांना सण, उत्सव साजरे करता यावे याकरिता आनंदाचा शिधा वितरीत करण्याचा निर्णय घेतला.: शासनाच्या निर्णयामुळे गोर गरीब, कष्टकरी व शेतकरी यांचा आनंद व्दिगुणीत झालेला आहे.आनंदाचा शिधा वाटपापासून एकही पात्र लाभार्थी वंचीत राहणार नाही यांची दक्षता
रेशन दुकानदार वैभव गोंडबे व शुभंम गोंडबे अशी सुचना दुकानदाराने दिलेली आहे. येथील स्वस्त धान्य दुकानदार वैभव गोंडबे व शुभंम गोंडबे यांनी आनंदाचा शिधा वितरण चार दिवसांपासून पासून सुरु केलेले आहे. या प्रसंगी
पत्रकार जब्बार तडवी, सुनील चोरमारे,रहीमखाॅन, गजानन काळे, संजय टिकारे, सुमनबाई खराटे यांच्या सह शिधा धारक मोठया संख्येने उपस्थित होते.