मुक्ताबाई विद्यालयाला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भरघोस यश

 


    शेळगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे,श्री संत मुक्ताबाई विद्यालय या विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेला ४१ विद्यार्थी बसले होते , ही शिष्यवृत्ती परीक्षा  दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी झाली. या परीक्षेतील १२ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले होते. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १० फेब्रुवारी रोजी लागलेला असताना, दिनांक २८ एप्रिल रोजी शिष्यवृत्ती परीक्षाची मेरिट लिस्ट लागली. आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रामाणिक कष्टाचे फळ त्यांना मिळालेली दिसून आले.

      NMMS शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ओमराज अशोक भोंग या विद्यार्थ्यास ६०,००० रु शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच NMMS अंतर्गत सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र (१)भांगे रिया दत्तात्रेय, (२)भांगे सानिका नितिन या दोन विद्यार्थ्यांना ५४,०००,५४,००० हजार रुपये प्रमाणे एकूण  १,०८,००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी दिली.

     या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री कांबळे बी.एल. व पर्यवेक्षक श्री लोंढे आर. डी, NMMS विभाग प्रमुख श्री डोळस ए.एस यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.मार्गदर्शक शिक्षकश्री.डोळस ए. एस.,श्री.गुंड व्ही.एस., श्रीम. टकले के. व्ही., सौ. आंबोले आर. ए. यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे धडे प्रमाणिकपणे शिकवले.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे स्कूल कमिटी ज्येष्ठ  सदस्य, साहेबराव शिंगाडे, भागवत भुजबळ,ॲडव्होकेट लक्ष्मणराव शिंगाडे,गावातील मान्यवर व पालक वर्ग यांनी  अभिनंदन केले !!!