सोयगाव तालुका प्रतिनिधी . रईस शेख
सोयगाव येथे शुक्रवारी झालेल्या वादळी गारपिटीच्या पावसात खंडित झालेला विद्युत प्रवाह सुरळीत करण्यासाठी खांबावर चढलेल्या झिरो वायरमनचा तोल गेल्याने खांबावरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दी.३०) सकाळी साडे अकरा वाजेदरम्यान घडली.
पोलवरून खाली पडून झालेल्या अपघातात Wगंभीर जखमी झालेल्या झिरो वायरमनचे नाव ऋषिकेश विष्णू बागले (वय २५) रा.नारळीबाग -सोयगाव असे असून तो महावितरण कंपनीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना मदतीसाठी वाल्मिकी पुराभागात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी खांबावर चढून तार जोडनी करत होता. तार जोडणी करून ताण देतांना त्याचा अचानक तोल गेल्याने तो ३० फूट उंचीवरून जमिनीवर पडला.
या अपघातात ऋषिकेश बागले या तरुणाच्या डोक्याला फाटले जाऊन मोठी जखम झाली आहे. तसेच हात व पाय फ्रँकचर झाल्याचे समजते. त्यास महावितरण कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी तात्काळ ग्रामिण रुग्णालय सोयगाव व तेथून शासकीय (१०८) रुग्णवाहिकेने डॉ. रघुनाथ फूसे यांच्या देखरेखीखाली जळगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती केले आहे.उपचारादरम्यान त्याची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य सूत्रांनी सांगितले आहे.