प्रतिनिधी : भीमराव कांबळे
दिनांक 26 एप्रिल 2023
मौजे ढाळेगाव ता. अहमदपूर येथे प्रति वर्षाप्रमाणे श्री संत नारायणजी अप्पा महाराज संस्थांनच्या वतीने आज दिनांक 26 एप्रिल रोजी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व वैराग्यमूर्ती श्री संत तुकाराम महाराज चरित्र कथा व अखंड हरिनाम सप्ताहास आज सकाळी ठीक नऊ वाजता श्री संत नारायणजी अप्पा महाराज संस्थानचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर पी एस कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष एडवोकेट भारत चामे, डॉ. चंद्रकांत उगिले, डॉ. व्यंकटेश पदातुरे (माजी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अहमदपूर ) श्री तुकाराम कदम ( मुख्याधिकारी नगरपरिषद गंगाखेड ) इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रसंगी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यासाठी उपस्थित होते. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणासाठी वाचक महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली हा सोहळा विविध कार्यक्रमाने दिनांक 26 एप्रिल ते 4 मे दरम्यान नऊ दिवस चालणारा असून श्री संत नारायणजी अप्पा महाराज संस्थांचे कार्यवाहक नामदेव कदम महाराज व ढाळेगावचे माजी सरपंच बबनराव हांडे यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे पंचक्रोशीतील भाविकांना आवाहन केले आहे