प्रतिनिधी भीमराव कांबळे
दिनांक 26 एप्रील 2023
अहमदपूर बस स्थानकात दिनांक 25 एफ्रील 2023 रोजी अहमदपूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी व इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रवाशांसाठी मोफत पाणपाई सुरू करण्यात आली आणि अहमदपूर येथील पत्रकार बांधवांनी या चांगल्या कार्याची दखल घेऊन बातम्या ही प्रसिद्ध केल्या जनते कडुन अगदी तोंड भरून कौतुक ही करण्यात आले मात्र दुसऱ्या दिवशी दिनांक 26 एफ्रील 2023 रोजी बसस्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांची भटकंती पाहण्यास मिळाली कारण कालच उद्घाटन झालेल्या पाणपोईला आज कुलूप होते,अनेक प्रवासी आपली पाणी पिण्याची तीव्र इच्छा घेऊन पाणपोई जवळ येऊन कुलूप बघून वापस जात होते. अनेकांनी पाण्यासाठी नेहमीप्रमाणे पैसे खर्च केल्याचे चित्र निदर्शनास आले. एक दिवसात पाणपोईला कुलूप असल्याने तहानलेल्या अनेक संतप्त प्रवाशांनी "फक्त बातमी व प्रसिद्धीसाठीच पाणपोई सुरू केली होती का ?"असे त्यांच्या तोंडून प्रश्न ऐकायला मिळाले.