मानवतावादाच्या दृष्टीकोणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य मोलाचे : डॉ.सुधीरजी तांबे


    संगमनेर : भारताचे संविधान हे जगातील अतिशय उत्कृष्ट असे संविधान असून मानवतेच्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, असे प्रतिपादन विधान परिषद महाराष्ट्र राज्याचे माननीय सदस्य डॉ.सुधीरजी तांबे यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत संगमनेर साहित्य परिषद आयोजित वर्धापनदिनाच्या समारंभात उपस्थित परिषदेच्या सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

       नुकताच संगमनेर साहित्य परिषदेचा वर्धापनदिन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभदिनी हॉटेल सत्यशिव , संगमनेर येथे मोठ्या दिमाखात झाला.कार्यक्रमाच्या सुरवातीस  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी मंचावर संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष मा.श्री.अरविंद गाडेकर, उपाध्यक्ष श्री.मेजर लक्ष्मण ढोले, सचिव श्री.दिलीप उदमले, वाचन मंडळ प्रमुख श्री.मनोज साकी , प्रकल्प प्रमुख श्री.गिरीश सोमाणी,प्रा.श्री.शशांक गंधे , प्रा.श्री.ज्ञानेश्वर गोंटे,  सामाजिक कार्यकर्ते मा. श्री .ज्ञानेश्वर राक्षे  यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्रा.श्री.शशांक गंधे यांनी आपले विचार मांडताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती सांगितली.साहित्य परिषदेचे अध्यक्ष मा.श्री.अरविंद गाडेकर यांनी परिषदेच्या कार्याची माहिती सांगत ओघवत्या शैलीत अहवालवाचन केले.

    यावेळी "खेळ मांडियेला" या नाटकातील कलाकार मा.श्री.सुरेशजी परदेशी सर , मा.श्री.दीपक टाक यांचा तसेच भीमज्योत तरुण मित्र मंडळ , महाळुंगे इंगळे ता.खेड.जि.पुणे तर्फे काव्य गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्द्ल परिषदेचे सहसचिव मा.श्री.दर्शन जोशी यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर संगमनेर साहित्य परिषदेच्या श्री.गणेश सराफ,श्री.गिरीश सोमाणी, श्री.ललितजी देसाई , श्री.दर्शन जोशी यांचे गीतगायन,सौ.स्मिता गुणे यांचे काव्यवाचन तसेच सभासदांतील उखाणे घेण्याच्या चढाओढीने कार्यक्रमात रंगत आली.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दिलीप उदमले यांनी केले. प्रास्ताविक श्री.गिरीश सोमाणी यांनी केले.आभार श्री.ज्ञानेश्वर राक्षे यांनी मानले.या कार्यक्रमासाठी सौ संगीता राक्षे, सौ सुवर्णा साकी, सौ श्रेया गंधे, सौ सविता गाडेकर, सौ.दीप्ती जोशी,  श्री रामनाथ सातपुते, सौ राधिका सातपुते,  श्री सुभाष कुर्हे, श्री राजेंद्र लगे,सौ.स्मिता सोमाणी, श्री विजय दीक्षित, सौ उषा दीक्षित, सौ पद्मा गोंटे, श्री तनुष पठाडे,  श्री प्रकाश कोटकर, सौ भारती टाक, श्री रामनाथ वाघ, श्री अजित वैद्य, श्री बाळकृष्ण महाजन,श्री अमोल गवांदे, सौ सुप्रिया गवांदे,  श्री यश गाडेकर, सौ प्रियांका पठाडे , सुलभा फडणीस यांची उपस्थिती होती.सुरुची भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.