मुंढेगाव शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री नरेंद्र सोनवणे मुलांसाठी साकारला पर्यावरण पूरक 'इकोब्रिक्स' उपक्रम



     इगतपूरी----आज आपल्या पृथ्वीवर  प्लॅस्टिक प्रदूषण ही एक महत्त्वमपूर्ण समस्या निर्माण झाली आहे आणि लोक सतत ते कमी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. सध्या एक उपाय जो लोकप्रिय होत आहे तो म्हणजे इको ब्रिक्स. इको ब्रिक्स म्हणजे प्लास्टिक कचऱ्याने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि त्या घर बांधकामात व रस्ते बनवण्यासाठी वापरणे. ते पर्यावरणास अनुकूल आणि किफायतशीर आहेत आणि प्लास्टिक कचरा पुन्हा वापरण्याचा एक सर्जनशील मार्ग देखील आहे. मुंढेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक नरेंद्र सोनवणे यांनी आपल्या शाळेतील ३५० विद्यार्थी व शिक्षक यांच्या मदतीने गेल्या वर्षभरापासून इकोब्रिक्स हा उपक्रम हाती घेतला आहे. सध्या ३७८ इकोब्रिक्स शाळेत तयार आहेत.जुन्या, निरुपयोगी प्लास्टिकच्या बाटल्या फेकण्याऐवजी त्यामध्ये प्लास्टिकचे रॅपर्स,  चिप्स व चॉकलेटचे रॅपर ,सुका प्लास्टिक कचरा, किंवा पॉलिथीनचे पॅकेट गच्च भरणे आणि झाकण बंद करणे,असे उपक्रमाचे स्वरूप आहे.मुलांना इको ब्रिगची संकल्पना, पर्यावरणातील त्याचे  महत्त्व, प्लास्टिकचे दुष्परिणाम समजल्यानंतर  विद्यार्थ्यांनी  उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

शाळेत पर्यावरणीय शिक्षणामध्ये इको ब्रिक्सचा वापर एक शिकवण्याचे साधन म्हणून केला जाऊ शकतो, प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर आणि पुनर्वापर कसा करायचा याचे प्रत्यक्ष कृतीयुक्त शिक्षण याद्वारा मुलांना देता येते,असे शाळेतील शिक्षक अनिल बागुल यांनी सांगितले.इकोब्रिक्स विटांचा वापर स्ट्रक्चर्स, फर्निचर, गार्डन प्लांटर्स आणि अगदी कलात्मक निर्मितीसाठी केला जाऊ शकतो. ते मजबूत आणि टिकाऊ आहेत, उत्कृष्ट इन्सुलेशन गुणधर्मांसह, आणि ते रासायनिक मुक्त आणि गैर-विषारी आहेत.भविष्यात इमारत बांधकामास इकोब्रिक्स वरदान ठरणार आहे.शाळेच्या या उपक्रमाचे मुख्याध्यापिका रेखा शेवाळे यांनी कौतुक केले.सरला बच्छाव,मालती धामणे,विमल कुमावत,सुनंदा कंखर,ज्योती ठाकरे,हेमलता शेळके,भगवान देशमुख,राजकुमार रमणे आदी शिक्षकांनी मेहनत घेतली अशी माहिती श्री रावसाहेब पगार सर यांनी दिली