एसटीच्या भीषण अपघातात महिला कंडक्टर सोबत १ महिला ठार; ५ प्रवासी गंभीर जखमी.

प्रतिनिधी मालेगाव: 

नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या आसरखेडाजवळ एका एसटी बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाता बस वाहक सारिका लहिरे यांचा मृत्यू झाला आहे. असून 5 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.समोरून आलेल्या एका वाहनानं दिलेल्या जबर धडकेमुळं एसटी बसचा चक्काचूर झाला आहे. एसटी बस नांदूरगड येथून मनमाडच्या दिशेनं जात होती, त्यावेळी हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर आता स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केलं असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समोरुन येणा-या वाहनाने बसला कट मारल्याने बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने बस अनियंत्रीत होऊन ती झाडावर जाऊन आदळली यात बसचा एक भाग पूर्णपणे कापला गेला. यात वाहकाच्या बाजूकडील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. यातील एक महिला प्रवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं महिला कंडक्टरचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आता जखमींना उपराचासाठी तातडीनं चांदवडच्या उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

 एका मोठ्या वाहनाचा आणि एसटीचा अपघात झाल्याची माहिती मिळताच आसरखेड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त एसटीतून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याशिवाय महिला कंडक्टरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एसटी बसला अपघात झाल्यानंतर मनमाडला जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.