सतीश कोळी,खुलताबाद शहर प्रतिनिधी
गेल्या कित्येक वर्षापासून/दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अत्यंत व अनेक जिव्हाळयाचे प्रश्न प्रलंबित आहेत.अनेक वेळा जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार केला,प्रत्यक्ष भेटी घेतल्या,निवेदन दिले तरी सुध्दा प्रश्न निकाली निघत नाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.या प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेचे लक्ष वेधन्यासाठी व ते प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षक समितीचे २४एप्रिल रोजी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 1 ते 5 या वेळेत बोंब मारो आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आज शिक्षक समितीकडून मुख्य कार्यकारी अधिकारी सह शिक्षणाधिकारी (प्राथ). जिल्हा परिषद,छत्रपती संभाजीनगर,यांना देण्यात आले.
शिक्षकाचे नियमीत मासिक वेतन दरमहा 1 तारखेला होत नसल्यामुळे शिक्षकांना नियमित कर्ज पतरफेड करतांना नाहक मानसिक,आर्थिक व शारिरीक भू्र्दंड सोसावा लागत आहे.यातून कायमची मुक्तता करण्यासाठी दरमहा 1 तारखेला वेतन मिळालेच पाहिजे.
महाराष्ट्र शासनाने वेतनासाठी भरीव तरतूद केली असता या तरतूदीतून इतर देयके शासनाची मंजुरी न घेता परस्पर वेतनाचा निधी खर्च केला जात असल्यामुळे यास पायबंद घालून आजतागायत झालेली गंभीर स्वरुपाच्या अनियमिततेची चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी.तसेच सहशिक्षक पदावर नियमित सेवा झाल्यानंतर 12 वर्षांनी मिळणारी चटोपाध्याय वेतनश्रेणी व 24 वर्षानंतर मिळणारे निवडश्रेणीचे प्रस्ताव तातडीने मंजुर करावे,
शिक्षकांचे प्राप्त होणारे विविध देयके देयकाच्या जेष्ठतेनुसारच तत्परतेने पुरेसा निधी उपलब्ध अदा करणे व देयकाची जेष्ठता डावलून शिक्षकांच्या वेतनाचे पैसे इतरत्र वळवून जुनी देयके मागे ठेवून प्रचंड आर्थिक अनियमितता करुन शिक्षकांच्या झालेल्या शोषनाची चौकशी करावी, विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यानी सातत्याने पदवीधर मुख्याध्यापक,केंद्र प्रमुख,विस्तार अधिकारी इ.संवर्गाच्या पदोन्नत्या विशेष मोहिम राबवून पूर्ण करण्याबाबत निर्देश दिलेले असतांना देखील अंतिम झालेल्या सेवाजेष्ठता यादीनुसार पदोन्नती प्रक्रिया राबविणे क्रमप्राप्त असतांना पुन्हा-पुन्हा वेगवेगळया यादया तयार करून पदोन्नतीच्या क्षेत्रातील शिक्षकांना वेठीस न धरता तात्काळ पदोनी प्रक्रिया राबवावी व पदोन्नती आदेश निर्गमित करावे,तसेच विलंबाची जबाबदारी निश्चित करावी.
शिक्षकांना नियमित वेळेवर वेतन न मिळाल्याने पतसंस्थेकडून कर्ज स्वरुपात रक्कम घेतल्यानंतर सदरील कर्जाचे हप्ते नियमित स्वरूपात भरल्यानंतर देखील शिक्षण विभागात कुठलीही सहकार विभागाकडून शहानिशा/खातरजमा न करता सदर शिक्षकांच्या वेतनातून वसुल झालेल्या रक्कमा देखील पुनश्च: वसुल करण्यासाठी केला जाणारा शिक्षण विभागाचा अनावश्यक हस्तक्षेप थांबवावा.
यासह वैद्यकीय बिलांसाठी व इतर ऑफलाईन देयकेसाठी देखील लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देणे,पदवीधर पदपरावर्तन ग्रेड परत करू इच्छित आहेत.करीता पदवीधर प्रमोशनपूर्वी अश्या इच्छुक शिक्षक बांधवाना ग्रेड परत करण्याची संधी द्यावी,भाषा सूट,स्थायित्व,परीक्षा परवानगी प्रस्तावातील त्रुटी दूर करून निकाली काढणे.मार्च 2023 च्या वेतनासाठी बजेट उपलब्ध करून रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपूर्वी वेतन व सण अग्रीम देणे, शिक्षक बांधवांचे विशेषतः ADCC बँक खातेदारक शिक्षकांचे वेतन,इन्कम टॅक्स कपातीच्या रकमा,घरभाडे भत्ता इ.तात्काळ खात्यात जमा करणे.
या अशा अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी हे बोंब मारो आंदोलन नाईलाजाने करावे लागत असल्याचे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर,सचिव रंजित राठोड,यांनी सांगितले यावेळी नितीन नवले शाम राजपूत,गुलाब चव्हाण,शालिराम खिस्ते,विष्णू भंडारी, पंडित भोसले,बबन थोरे,राजू ठाकूर,नामदेव चव्हाण,रऊफ पटेल,के. के.जंगले ,दिलीप रासने, लक्ष्मीकांत धाडबळे,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी,कडूबा साळवे,के. डी.मगर,अशोक डोळस, कैलास ढेपले,प्रकाश जायभाये,दत्तात्रय खाडे,पंकज सोनवणे, बबन चव्हाण,दिलीप ढमाले,निंबा साळुंके,नितीन कपटी,विलास साळुंखे, विलास बापू चव्हाण, भाऊसाहेब बोर्डे,टि.के. पुनवटकर,चंदू लोखंडे, अंकुश वाहूळ,उर्दू जिल्हाध्यक्ष जावेद शेख, फातिमा बाजी,पाशु शहा,गौस शेख,महिला जिल्हाध्यक्ष मंगला मदने,वर्षा देशमुख, सुनिता चितळकर,अर्चना गोर्डे, वैशाली इंगळे,जयश्री राठोड,प्रीती जाधव,शीलाताई बहादुरे,शितल भडांगे, क्षिसागर मॅडम,कल्पना नाईक,वैशाली हिवर्डे उपस्थित होते.