वानाडोंगरीतील स्कूल ऑफ स्कॉलर शाळेचे छत कोसळल्याने छताच्या ढिगाऱ्याखाली दबून सुरक्षारक्षक ठार झाला. ही दुर्दैवी घटना आज शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली. रवींद्र कामेश्वर उमरेडकर (५२, किन्ही, हिंगणा) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे.गेल्या काही दिवसांपासून शहरात सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली तर काही इमारतीच्या भिंतीही पडल्या.
वानाडोंगरी परिसरात स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळा आहे. या शाळेच्या भिंतीला तडे गेले होते. त्यामुळे ती कधीही पडण्याची शक्यता होती. शनिवारी सकाळी शाळेचे छत कोसळले. त्या ढिगाऱ्याखाली दबून सुरक्षारक्षक उमरेडकर याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.