प्रतिनिधी विनोद दिगंबर मोरे
मारीगोल्डच्या 4 थ्या वर्षाचं सेलिब्रेशन मारीगोल्डचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. शंतनु शंकर देशपांडे त्यांच्या पत्नी बिझिनेस पार्टनर सौ.ललीता शंतनु देशपांडे व त्यांची कन्या कु. गार्गी शंतनु देशपांडे तसेच सी ई ओ गौरव भगत, जनरल मॅनेजर मनीष वासुदेवा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
ललीता मॅडम च्या सकलपणेतून त्यांनी स्नेहवन आश्रमाचे संस्थापक श्री अशोक देशमाने यांच्याशी चर्चा करून मुलांना बोलावून त्यांना गिफ्ट देऊन त्यांना स्नेहभोजन देऊन केक कापून सर्वांना भरभरून आशिर्वाद दिला. लाखांचा पोशिंदा, देव माणूस आसे वर्णन देशपांडे सरांचे सर्व कर्मचारी करतात. अवघ्या 4 वर्षात मारिगोल्ड चे नावं पंचतारांकित हॉटेल्सच्या बरोबर गणले जात आहे.