प्रतिनिधी मारुती जिंके
कंधार :- (दि.28एप्रिल) दररोजची नापिकी व बँकेच्या कर्जाला कंटाळून कंधारेवाडीतील शिवाजी रामराव मंगनाळे (वय 35) या शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 28 एप्रिल सकाळी 9 सुमारास फुलवळ शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची घटना घडली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे वडील रामराव मंगनाळे यांना अर्धांग वायू झाला असून काही दिवसापासून घरातच पडून आहेत घरची परिस्थिती हल्लाकीची बनली असून. वडिलांच्या रुग्णाचा खर्च व दैनंदिन नापिकी, गत दोन-तीन महिन्यापासून कंटाळून चिंताग्रस्त झाला होता.