सुलतानपूर ग्रामपंचायत कडून काही कारण नसताना मुख्य रोडवरीलअतिक्रमन त्वरित काढणे असे नोटीस |
दिनांक 19एप्रिल2023 रोजी सरपंच ग्रामसेवक हुकुमशाहीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाले असून त्यांना सुलतानपूर ग्रामपंचायत कडून काही कारण नसताना मुख्य रोडवरीलअतिक्रमन त्वरित काढणे असे नोटीस देऊन आपले दुकाने उठवा या नोटीसमुळे व्यापारी वर्गामध्ये एकच तारांबळ उडाली, मागील दोन वर्षापासून कोरोना मुळे सर्व व्यापारी वर्ग हवालदिल झाले होते यावर्षी आपला उदारनिर्वाह करण्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्यांनी मोठी आशा होती अशातच सुलतानपूर ग्रामपंचायत मुख्यालय रोडवरील,दुकानाच्या अतिक्रम त्वरित काडा, असे दोन नोटीस दिले सदर नोटीस मुळे व्यापारी वर्गात निराश झाले असून यावेळी सुलतानपूर येथे जल योजना,भूमिपूजन साठी आमदार माननीय श्री संजय जी रायमुलकर साहेब येणार असल्याची माहिती मिळाल्यास सर्व व्यापारी वर्गांनी एक निवेदन तयार केले होते.
त्यांनी ग्रामपंचायत कडून,आपल्या होणारा अन्याय बद्दल सर्व उल्लेख केला हो या निवेदनाची एक प्रत भूमिपूजन कार्यक्रम दरम्यान माननीय आमदार,साहेबांना देण्यात आले बस स्टँड वरील छोटे मोठे,व्यापाऱ्यांना अंधाराला एक दिवा म्हणजे संजयजी साहेब हे दिसले दरम्यान कार्यक्रम संपन्न झाल्यावर सर्व व्यापारी वर्ग साहेबांना पुन्हा भेटून साहेब आमच्या निवेदनाकडे लक्ष द्या आमदार साहेबांनी हसमुख चेहरा नी हो मी पाहतो असा दिलासा सर्वांना दिला सदर निवेदनाची प्रत सुलतानपूर ग्रामपंचायत कार्यालय देण्यात आली
सदर निवेदन प्रति मध्ये सर्व गावातील अतिक्रमण धारकावर कारवाई करा अन्यथा केवळ आम्हाला टारगेट करू नका ग्रामपंचायत ने नोटीस न थांबल्यास आम्ही सर्व गोरगरीब व्यापारी आमच्या कुटुंबासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करणार व या उपोषण दरम्यान काय आमच्या कुटुंबास,जीवित हानी झाल्यास याची ग्रामसेवक व सरपंच जबाबदार राहील महोदय आपण या प्रकरणी लक्ष घालून आमच्यावर होणारा अन्याय दूर करून आम्हाला पुढील वेळ येणार नाही आपल्याकडून गोरगरिबांना ही अपेक्षा असा उल्लेख करून निवेदन देण्यात आला यावर संपूर्ण गावातील व्यापारी वर्ग व नागरिक लक्ष लागून आहे सदर निवेदनावर दिनकर खेत्री, दिगंबर साखरे कांता जाधव ,दिनकर पवार ,विजय ढवळे आयुब पठाण,गजानन जाधव अब्दुल रहीम , शेख मेहबूब ,कल्याण शिंदे दिलीप मसुरे ,संजय काळे, सलमान पठाण, गोपाल नालींदे, , वसंता पनाड निसार शेख इम्रान पठाण,,शेख मोहम्मद,शुभम भालेराव, बळीराम हरकाढ, चंदू शिराळे , फिरोज खान, विजय नागरिक, आदीं मोठ्या संख्येने व्यापाराचे स्वाक्षरी आहे