किरण माने इंदापूर प्रतिनिधी
दिनांक 16 एप्रिल रोजी कडबडवाडी येथील जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजना, नवीन ग्रामपंचायत कार्यालय,व्यायाम शाळा,अंतर्गत रस्ते,बंधारे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय मामा भरणे, मोहोळचे आमदार श्री यशवंत तात्या माने यांच्या शुभहस्ते एकूण 2 कोटी 56 लाख रुपये विविध विकास कामाचा भूमिपूजन उद्घाटन समारंभ संपन्न झाला...
तसेच यावेळी महाराष्ट्र शासनाचा माजी मुख्यमंत्री स्व डॉक्टर शंकरराव चव्हाण जलभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मा.श्री भजनदास विठ्ठल पवार सर यांचा नागरी सत्कार माजी मंत्री दत्तात्रय मामा भरणे व आमदार यशवंत तात्या माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
श्री भजनदास पवार सर यांनी 1972 च्या दुष्काळानंतर निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई स्वतः जवळून पाहिल्यानंतर पाण्याचा प्रश्न हा जीवनाचा प्रश्न आहे हे ओळखले,आणि त्यानंतर त्यांनी ज्या ज्या मार्गाने शक्य होईल त्या त्या मार्गाने जलसेवा करत आले आहेत. आणि 1994 साली अण्णा हजारे यांनी कडबनवाडी गावाला भेट दिली हिरवे बाजारचे श्री पोपटराव पवार जलपुरुष श्री राजेंद्र सिंग यांनी गावातील जलसाधारण आणि वनांमध्ये केलेल्या कामाचे कौतुकही केले. गेली 30 वर्ष हे भजनदास पवार सर हे प्रामाणिकपणे काम करत आहेत, आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन श्री भजनदास पवार सर यांना जलभूषण पुरस्कार जाहीर केला. आणि हे छोटेसे कडबनवाडी गाव देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजत आहे. तसेच कडबनवाडी गावांमधील ऑक्सिजन पार्क पाहण्यासाठी अनेक ठिकाणहुन लोक गर्दी करत आहेत..
या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री तथा आमदार श्री दत्तात्रय मामा भरणे, मोहोळचे आमदार श्री यशवंत तात्या माने, श्री प्रताप (आबा )पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य ),युवा नेते वैभवजी शिंगाडे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रतापसिंह चवरे,श्री शुभम निंबाळकर,श्री सतीश गावडे गुरुजी,शेळगाव चे सरपंच रामदास आप्पा शिंगाडे, कडबनवाडीचे सरपंच दादासाहेब जाधव, उपसरपंच आप्पासाहेब गावडे,ग्रामसेवक ज्ञानदेव मासाळ, शब्बीर भाई सय्यद, नितीन जाधव ,सामाजिक कार्यकर्ते तानाजी धोत्रे, राजेंद्र उचाळे, संतोष शिंगाडे( पोलीस पाटील ), मोहम्मद शेख, तसेच इतर सर्व मान्यवर ग्रामपंचायत सदस्य आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री लक्ष्मण विठ्ठल पवार सर यांनी केले. व सूत्रसंचालन अमोल धापटे यांनी केले.