महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कर्मवीर भाऊसाहेब हिरे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय निमगाव येथे आज दि.०६ एप्रिल २०२३ रोजी इतिहास विभागाच्यावतीने 'इतिहास संशोधन पद्धती' या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्याख्यान मालेचे उद्घाटनप्रसंगी अभोणा महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ.श्रीहरी थोरवत हे उपस्थित होते. त्यांनी या व्याख्यान मालेचे पहिले पुष्प गुंफले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. राजाराम शेवाळे उपस्थित होते.
डॉ श्रीधर थोरवत यांनी इतिहास म्हणजे काय? व आधुनिक इतिहासाच्या विविध शाखांची माहिती करून देताना आधुनिक कालखंडातील इतिहासाच्या नव-नवीन संशोधन पद्धतींची ओळख करून दिली.इतिहास संशोधनाच्या साधनांची ओळख करून देताना डॉ.थोरवत यांनी प्राथमिक व दुय्यम साधनाची वैशिष्ठ्ये स्पष्ट केली. तशीच इतिहासातील अंतर्गत व बाह्यांग चिकित्सा या विषयावरही प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजाराम शेवाळे यांनी आपल्या भाषणातून कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी स्थापन केलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा आढावा घेताना संस्थेच्या वतीने राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक उपक्रमांचा उल्लेख केला. तसेच महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचाही उल्लेख केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक उद्धव कुडासे यांनी केले. यावेळी त्यांनी व्याख्यानमालेचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उज्जन कदम यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते