खिर्डी प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे
रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची इमारत अतिशय जीर्ण व पडकी झालेली असुन वर्ग खोल्यांवरील छत आणि खांब पडलेले आहे.तसेच शाळेच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने भिंती केव्हा कोसळतील याची शास्वती नाही.तसेच शाळेच्या जवळून अंगनवाडी मध्ये शिकणारी लहान मुले व ग्रामस्थ या रस्त्याचा वापर करत असून सदर ठिकाणी मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे.या प्रकाराकडे संबंधित विभागाने गांभीर्यपूर्वक लक्ष देवून योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी अशी मागणी पालक वर्गासह सुज्ञ नागरिकांनी केली आहे.