अनिकेत मशिदकर मालेगाव प्रतिनिधी
जिल्ह्यात पावसाचे थैमान अजूनही सुरूच असून, शनिवारी (दि. १५) सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, तसेच लासलगाव जिल्ह्यातील अनेक गावांना गारपिटीने झोडपले. ग्रामीण भागाप्रमाणेच नाशिक शहरातील अनेक भागांतही गारांचा पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच भिजून गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. दिंडोरी तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसल्याने द्राक्ष शेतींसह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात एक तास तुफान गारपीट झाल्याने द्राक्षबागांमध्ये गारांसह द्राक्षाचा खच पडला होता.
दुपारनंतर उन्हाचा चटका लागत असताना, सायंकाळी मात्र आभाळ दाटून आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने धुमाकूळ घातला. शहर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारांनी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे परिसरात सायंकाळच्या सुमारास पंचनामे सुरू असतानाच, पुन्हा बरसलेल्या पावसाने शासकीय यंत्रणांना दुबार पंचनामे करावे लागणार आहेत.
जोरदार पाऊस आणि गाराही पडल्या. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचले, तर अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच भिजून गेल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. दिंडोरी तालुक्याला गारपिटीचा तडाखा बसल्याने द्राक्ष शेतीसह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात एक तास तुफान गारपीट झाल्याने द्राक्ष बागांमध्ये द्राक्षांसह गारांचा खच पडला होता.