आज दहिवेल गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी" दहिवेल गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती अगदी आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. आज सकाळी 11 वाजेला दहिवेल येथील भीम नगरात दहिवेल ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच श्री प्रकाश भाऊ वळवी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तसेच या कार्यक्रमासाठी दहिवेल गावातील उपसरपंच श्री अमोल भाऊ सोनवणे श्री भाऊसाहेब प्रभाकर देवराव पाटील, श्री वसंतराव बच्छाव, श्री श्रावण सखाराम माळी, डॉ. श्री दिनेश मराठे, डॉ. श्री विनोद बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते श्री संजय कालेश्वर बच्छाव. तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री कन्हैया लाल माळी व ग्रामपंचायत सर्व सदस्य यांनी बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. तसेच या कार्यक्रमासाठी भीम नगरातील आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व तरुण बांधव ,माता-भगिनी यांनी सुद्धा अभिवादन केले. लहान बालकांनी भीम गीत ऐकवले. व सायंकाळी गावात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.