आय.सी.एस.ग्रंथालयाच्या ‘सेल्फी विथ बुक’ स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


सुर्यकांत बडबे खेड प्रतिनिधी

           येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिन’ एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून या ग्रंथालयाने 'सेल्फी विथ बुक' या स्पर्धेचे आयोजन केले होते. 
           आजचा विद्यार्थी हा वाचनापासून दूर जातो आहे, असा सार्वत्रिक अनुभव आहे. विद्यार्थी मोबाईल मध्ये अडकला आहे, त्याचं वाचन कमी झाल आहे, असे असताना अशा विद्यार्थ्यांना वाचनाच्या प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी या ग्रंथालयाचा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला आहे.   



    या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील कोणतेही एक पुस्तक वाचून त्यावर दहा ते पंधरा ओळींमध्ये आपला अभिप्राय द्यायचा होता. त्याचबरोबर त्या पुस्तकासोबत आपला एक सेल्फी पाठवायचा होता. सेल्फी आणि अभिप्राय या दोघांचे गुण लक्षात घेऊन स्पर्धकांमध्ये प्रथम तीन क्रमांक काढले गेले.
         सृष्टी भूषण काणे (तृतीय वर्ष व्यवस्थापन) हिने प्रथम क्रमांक, कु. चैताली सचिन यादव (प्रथम वर्ष विज्ञान) हिने द्वितीय क्रमांक  व कु.विवेक विष्णु शिर्के (द्वितीय वर्ष कला) याने तृतीय क्रमांक पटकावून सदर स्पर्धेचा आनंद घेतला.   
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष हिराभाई बुटाला,उपाध्यक्ष नंदकुमार गुजराथी, कार्याध्यक्ष .मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाचे चेअरमन ॲड.आनंदराव भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल डॉ.राजेश राजम यांनी केले.