निवडून दिलेले 40 गद्दार झाले ,परंतु निवडून देणारे माझ्यासोबत आहे

प्रतिनिधी चंदू खरे --पाचोरा

दिनांक 23 /4 /2023 रोजी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा पाचोरा येथे आयोजित करण्यात आली होती स्वर्गीय माजी आमदार तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या पूर्ण कृती पुतळ्याच्या अनावर व निर्मल सीड्स च्या  लॅबच्या उद्घाटनासाठी उद्धव साहेब ठाकरे आले होते, यानंतर संध्याकाळी सात वाजता पाचोरा येथे सभास्थळी त्याचं आगमन झाल, माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब ,आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली  यावेळी लाखो शिवसैनिक सभेला हजर होते सभेला उपस्थित शिवसैनिक पाहून ,मात्र पाचोर्‍याचं राजकारण बदलण्याचा स्पष्ट चित्र दिसत होतं माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे फटाक्यांच्या आतिश बाजित  स्वागत करण्यात आल  तो सोहळा नयन रम्य होता, 


उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की चाळीस  गद्दार गेले तरी फरक पडत नाही परंतु एक विश्वासू माजी आमदार तात्यासाहेब आर ओ पाटील यांच्या सारखा विश्वास माणूस गेला तर नक्कीच उनिव भासते , तसेच त्यांनी गद्दारांना  चॅलेंज केले तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेऊन मैदानात या मी माझं नाव घेऊन मैदानात येईल आणि तुम्हाला तुमची जागा सच्चे शिवसैनिक दाखवल्याशिवाय राहणार नाही, प्रमाणे पाकिस्तानला जर विचारलं खरी शिवसेना कोणाची आहे तर ते सांगतील परंतु आमचे मोतीबिंदू झालेले  निवडणूक आयोग यांना ते दिसत नाही, येणाऱ्या काळात गद्दारांना तुम्हाला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे , खरी शिवसेना कोणती तसेच वैशालीताई सूर्यवंशी यांचं कौतुक करत त्यांनी सांगितलं की कुटुंबातले संस्कार हे संस्कार असतात जसे आमचे आर ओ तात्या पाटील शिवसेनेची प्रामाणिक होते त्याचप्रमाणे वैशालीताई पाटील यांनी शिवसेनेसोबत राहून एक आपल्या वडिलांचा प्रामाणिकपणा एकनिष्ठ पणा आणि घराण्याचे संस्कार दाखवून दिले