लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी

 


    काल दिनांक 20/4/2023 /(वार गुरुवार )रोजी सायंकाळी झालेल्या वादळी , वाऱ्याच्या पावसाने पहूर व पारधी या शिवारात शेतीचे नुकसान होऊन शेतकरी संकटात सापडले ही वार्ता  मिळताच आज दिनांक/21/4/2023/(शुक्रवार) रोजी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संजय दादा गरुड व तालुका अध्यक्ष विलास भाऊ राजपूत राष्ट्रवादी विश्वजीत भाऊ मनोहर पाटील यांनी झालेल्या  नुकसानीची पाहणी  करून शेतकऱ्यांच्या संवाद केला याप्रसंगी संजय दादा गरुड यांनी फोन द्वारे तहसीलदार महादयांना माहिती देता लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी केली आणि ताबडतोब स्थानिक तलाठी पंचनामा करायला सुरुवात केली  यावेळी सौरभ अवचार प्रताप परदेशी नाना पाटील योगेश परदेशी व अजय परदेशी दिनेश परदेशी व सुभाष परदेशी मुकेश जाधव पत्रकार व विनोद कोळी व  ईश्वर चोरडिया भगवान लोहार व पाळधी  आणि पहुर शिवारातील अनेक शेतकरी बांधव  बांधव उपस्थित होते