तीन मुलांच्या आईची तलावात आत्महत्या



दै कर्णधार प्रतिनिधी सलमान मुल्ला 

याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील कांचन उर्फ राणी बबन बनसोडे (वय 40 वर्षे), अनुषका बबन बनसोडे (14 वर्षे ) राजविर बबन बनसोडे (10 वर्षे) व राजनंदीनी बबन बनसोडे (वय 7 महिने) यांनी आत्महत्या केली.कांचनचे पती बबन बनसोडे याची नौकरी गेल्याने ते कुटुंब आर्थिक अडचणीत होते त्या तणावातून पतीला व्यसन जडले.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार याला कारणीभूत म्हणजे कोंड गावात होणारी अवैध दारू विक्री आहे कारण कोंड गावात प्रत्येक गल्लीबोळात आणि टपरीवर सुद्धा अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे काही दिवसापूर्वी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापेमारी करत हजारो लिटर दारू नष्ट केली होती आणि दारू विकणाऱ्यांची यापुढे घरी केले जाणार नाही अशी ताकीद दिली होती..

मात्र  पोलिसांच्या आदेशाला देखील न जुमानता अवैधरित्या दारू विक्री करणारे खुलेआम विक्री करत असल्याचे आजही गावात दिसून येत आहे या घटनेच्या निषेधार्थ समस्त कोंड ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे.. तर गावातील अवैध दारू विक्री बंद केल्याशिवाय अंत्यसंस्कार होऊ देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे..