पोलीस हे समाजाचे रक्षक असतात. पोलिसांनी समाजात वावरत असताना गुन्हेगारांमध्ये आपला वचक निर्माण करावा; परंतु सर्वसामान्य माणूस व समाजामध्ये मैत्रीचे संबंध ठेवून सामाजिक बांधिलकी राखण्याची काम करावे असे येवला ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे साहेब यांनी प्रतिपादन केले. नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये निल रत्न रो हाऊस येथील गरीब कुटुंबातील करण शामराव गाडे हा विद्यार्थी मुंबई पोलीस मध्ये भरती झाल्यानंतर त्याच्या सत्कार प्रसंगी एकनाथ भिसे साहेबांनी हे वक्तव्य केले. आजच्या काळामध्ये नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत चालला आहे;
परंतु पोलिसांनी नागरिकांना वेळोवेळी सहकार्य करून गुन्हेगारांमध्ये आपला दरारा निर्माण करावा.. नागरिकांनीही पोलिसांना आवश्यक असलेली माहिती देऊन त्यांना सहकार्य करावे. येवला शहर तसेच येवला तालुका हा सुरक्षित व गुन्हेगारी मुक्त राहण्यासाठी पोलीस व नागरिक या दोघांनीही बरोबरीने प्रयत्न करण्याचे गरजेचे असल्याचे भिसे साहेबांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी पोलीस हवालदार किरण पवार, देविदास उबाळे ,प्रशांत नागपुरे, कैलास जेजुरकर ,परशुराम बागुल, भगवान बोढरे ,विशाल उकाडे, शामराव गाडे ,सचिन गोरडे, किरण जाधव ,संजय हिरे ,गोकुळ जाधव ,देविदास साठे ,वाल्मीक नवले, सुनील हिंगे ,सुनिल शिंदे यांच्यासह नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते..