शिक्षकांच्या प्रश्नांसाठी भांडू जिल्हास्तरीय त्रैवार्षिक प्राथमिक शिक्षक समितीचे चौफुला येथे अधिवेशन





सतीश कोळी,शहर प्रतिनिधी खुलताबाद

    पुणे जिल्ह्यातील शिक्षकांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. मात्र, आश्वासनांचा पाऊस पाडणारे हे राज्य सरकार शिक्षकांच्या पाठीशी उभे राहत नाही, हा मोठा गहन प्रश्न आहे. येथून पुढे पुणे जिल्ह्यातील शिक्षकांचा बुलंद आवाज हा रवींद्र धंगेकर असेल. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सरकारशी भांडू, हा माझा शब्द आहे, असे प्रतिपादन  कसबा विधानसभेचे आमदार धंगेकर यांनी केल्याचे शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी(छत्रपती संभाजीनगर)यांनी सांगितले. चौफुला (ता. दौंड) येथे जिल्हास्तरीय त्रैवार्षिक प्राथमिक शिक्षक समितीचे अधिवेशन काल रविवार दि.९ एप्रिल रोजी पार पडले, त्या वेळी धंगेकर बोलत होते. धंगेकर म्हणाले की, राज्य सरकारचे शिक्षकांबाबतीत चुकीच्या पद्धतीने काम चालू असून, पेन्शन योजना, अपघाती विमा योजना, अशा अनेक प्रश्नांवर आज हे सरकार मार्ग काढत नाही. शिक्षकांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी रस्त्यावर उतरून चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या सरकारविरोधात शिक्षकांच्या पाठीशी उभा राहणार आहे. माजी आमदार रमेश थोरात हे माझे मुख्याध्यापक असून, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर रमेश थोरात आणि मी आमदार असेल त्या वेळी शिक्षकांचा एकही प्रश्न राहणार याची मी ग्वाही देतो.

या वेळी जिल्हा बँकेचे संचालक  तथा माजी आमदार रमेश थोरात सकारात्मक विचार करू. म्हणाले की, अपघात विमा विषय मार्गी लावण्याबाबतीत पाठपुरावा करून शिक्षकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, शिक्षकांच्या अडचणी राज्य सरकारने दूर केल्या, तर शिक्षकांना पुढील अभ्यास करण्यास वेळ मिळेल. 5 सीसीचे व्याजदर कमी करण्याबाबतीत सकारात्मक विचार करू.

या प्रसंगी भीमा पाटस'चे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, राज्य अध्यक्ष विजय कोंबे,शिक्षक नेते उदय शिंदे,सरचिटणीस राजन कोरगावकर, जिल्हाध्यक्ष नंदकुमार होळकर, सुनील लोणकर,विश्वनाथ कौले उपस्थित होते.