उदगीर :- बहुजन समाज विकास परिषद,अहमदपुर या संस्थेस सन 2019-20 मध्ये उदगीर तालुक्यातील 87 ग्रामपंचायतीच्या लोक जैवविविधता नोंदवही तयार करण्याचे काम दिले होते त्या अनुषंगाने सदरील संस्थेने 87 ग्रामपंचायती सोबत त्रिस्तरीय करारनामा करून कामास सुरुवात केली व वेळेत काम पूर्ण करून सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून ते गट विकास अधिकारी मार्फत मुख्याधिकारी लातूर , महाराष्ट्र राज्य जैव विविधता मंडळ नागपूर , सर्व ग्रामपंचायत कार्यालयांना लोक जैवविविधता नोंदवही सादर केलेली आढळते सदरील संस्थेने त्यांना दिलेले काम वेळेत पूर्ण केलेल्या असल्याने त्यांना करारनाम्याप्रमाणे मोबदल्या मिळणे आवश्यक होता पण 78 ग्रामपंचायतीने त्यांना अद्याप त्यांच्या कामाचा मोबदला आदा केलेला नाही सदरील संस्थेने ग्रामपंचायतींना वेळोवेळी मागणी करून त्यांना कराराप्रमाणे ठरलेली रक्कम मोबदला दिला नसल्याने त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार देऊन बीले आदा करण्याची मागणी केली त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी पंचायत समिती उदगीर यांनी 1) 08/02/2021 , 2) 06/10/22 3) 21/11/22 सदरील तारखांना संबंधित सरपंच/ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय यांना पत्रद्वारे आदेशित करून सदरील देयके अदा करण्याचे आदेश दिले तरीसुद्धा या आदेशाला ग्रामसेवकांनी केराची टोपली दाखवत सदरील बिले न देता सदरील करानाम्याचे उल्लंघन केलेले आहे असे दिसते.
तसेच संस्थेने गटविकास अधिकाऱ्यामार्फत मुख्याधिकारी यांना दिलेल्या नोंदवह्या ह्या मुख्याधिकारी लातूर यांना पोहोचल्या गेल्या नाहीत याची चौकशी केली असता ते रेकॉर्ड पंचायत समिती उदगीर येथून मुख्याधिकाऱ्यांना पाठवले गेले नाही व ते रेकॉर्ड उदगीर पंचायत समिती येथून गाहाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे वरील सर्व हकीगत पाहता सदरील ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी हेतू पुरस्सर संस्थेस बिले देणे टाळून त्रिस्तरीय कराराचे उल्लंघन केले असुन गट विकास अधिकाऱ्यांचा आदेश ना जुमानता कर्तव्यात कसुर केली आहे त्यामुळे संबंधित सर्व ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करून त्यांची खातेनिहाय चौकशी लावून कायदेशीर कारवाई करावी तसेच रेकॉर्ड गहाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करावी.
सदरील प्रकरणी संबंधित दोषी ग्रामसेवक व कर्मचारीवर कायदेशीर कारवाई करावी व संबंधित संस्थेस न्याय देवुन त्याची बिले तात्काळ आदा करण्यात यावी अन्यथा संस्थेस न्याय मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आंदोलन हाती घेईल याची नोंद घ्यावी.आशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड,शहराध्यक्ष संतोष भोपळे, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष बापुराव जाधाव,शाखाध्यक्ष योगेश पवार आदी उपस्थित होते.