१२ व्या राज्यस्तरीय चिञरंगभरण स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न

महाराष्टातून भविष्यातील उत्तम चिञकार घडविण्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन-कृष्णकुमार गोयल

साई कला आविष्कार नाट्य संस्था,भोसरी,पुणे व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान,पुणे संयुक्त विद्यमाने दरवर्षी राज्यस्तरीय चिञरंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या वेळी वृक्षाचे पुजन करुन,पाणी घालून आगळ्या वेगळ्या पध्दतीने पर्यावरण संदेश देत उदघाटन संपन्न झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकामध्ये साई कला आविष्कार नाट्य संस्थेचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी संस्थेची माहिती व कार्याची ओळख करुन दिली.यावेळी कार्यक्रम अध्यक्ष सुप्रसिदध चिञकार सुहास जगताप होते.ते म्हणाले,"रंगाशी तुम्ही खेळला तर रंग तुमच्याशी खेळतील.चिञकला ही एक साधना आहे.आपल्याला जीवनात जे काय बनायचे ते प्रामाणिक बना.त्यामागे मेहनत घ्या.चिञकला स्पर्धेतील यशस्वी विदयार्थी हा भविष्यातील मोठा चिञकार आणि कवी होऊ शकतो.मुलांची आवड पालकांनी जपली पाहीजे."

कार्यक्रमात पारितोषिक वितरण ज्यांच्या शुभहस्ते झाले.ते प्रमुख अतिथी उद्योजक कृष्णकुमार गोयल म्हणाले,"कलाकाराला त्याची कला दाखविण्याची संधी हि, अशा स्पर्धेतुन मिळत आहे.चिञ दिल्यावर कोणत्या ठिकाणी कोणता रंग भरायचा याचे कौशल्य अशा स्पर्धेतुन शिकायला मिळते.इंद्रधनुष्याचे रंग कोणत्या क्रमाने असतात ते देता आले पाहीजे.भविष्यात संपुर्ण महाराष्टातून चांगले चिञकार घडावे आणि घडतील अशी आशा आहे.हे काम गेली बारा वर्षे चालू आहे.पालक आजचे आपल्या पाल्याबद्दल जागृत आहेत.मुलाच्या आवडीला जोपासताना दिसत आहे.ही समाधानाची बाब आहे.या चिञरंगभरण स्पर्धेतुन दरवर्षी एका थोर व्यक्तिमत्वाचा परिचय विद्यार्थी वर्गास होण्यास मदत होते.मोठ्याप्रमात पुढील वर्षीही या स्पर्धेत सहभागी व्हावे.सर्व विजेत्यांचे अभिनंदन करतो."यावेळी प्रमुख पाहुणे उद्योजक रामदास माने म्हणाले की,"आपल्या जीवनात कला जपत असताना.रोजगाराची संधी सुध्दा आपल्याला मिळविता आली पाहीजे."साई कला आविष्कार नाट्य संस्था,भोसरी,पुणे व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विद्यार्थी वर्गात कलेची आवड निर्माण व्हावी.कलासक्त नागरिक घडावे. या उद्देशाने दरवर्षी या राज्यस्तरीय भव्य चिञरंगभरण स्पर्धेचे आयोजन केले जाते.हे आयोजनाचे १२ वे वर्षे आहे.

या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त संत ज्ञानेश्वर यांच्या जीवन चरिञावर ही स्पर्धा घेण्यात आली.संपूर्ण महाराष्टातून यात विद्यार्थी सहभाग शाळांतून नोंदवला.यावेळेस नाशिक,सोलापुर,चंद्रपुर,छञपती संभाजीनगर,जळगाव,पुणे,पिंपरी चिंचवड,डोंगरागाव,माळशिरस, फणसवाडी ,वाकी, भावली बु. ता. इगतपूरी रायगड ,महाड, कन्नड,  नंदूरबार, उरुळीकांचन, डोंगरगाव, इगतपूरी, मंगळवेढा, अक्कलकोट, वरोरा,चोपडा,चाळीसगाव,निगडी,पिंपरी,भोसरी इ.अनेक विभागातून १५ हजार विद्यार्थी सहभाग झाले.

    प्रत्येक सहभागींना सन्मानपञ विद्यालयात देण्यात आली.पारितोषिक प्राप्त विद्यार्थी वर्गास तसेच मुख्याध्यापक,मुख्याध्यापिका,कलाशिक्षक व कलाशिक्षिका यांना स्मृतीचिन्ह सन्मानपञ देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात  आले.यावेळी "आविष्कार रंग" या नावाने उत्तम रंगविलेल्या व विजेत्यांच्या चिञांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.यावेळी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर  घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत यशस्वी झालेल्या स्पर्धेकांचा सुध्दा सन्मान करण्यात आला.सर्व विजेत्या विदयार्थी वर्गास गोल्डमेडल,आकर्षक सन्मानपञ सुप्रसिदध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिदध चिञकार सुहास जगताप,उद्योजक कृष्णकुमार गोयल,पुणे,प्रमुख पाहुणे उद्योजक रामदास माने,योगेश आमले,श्रीमती स्निग्धा बॅर्नजी,अशोक येवले,प्रविण तुपे,डाॅ.सौ.अलका नाईक ,बाळासाहेब भालेराव,प्रा.दिलीप गोरे, प्रशांत फुले रविद्र पाटील ,श्रीम विघा पाटील श्री रावसाहेब पगार  इ.अनेक मान्यवर उपस्थित होते.सायन्स पार्क थिएटर ,चिंचवड मध्ये नुकताच हा भव्य सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.विद्यालयातील मुख्याध्यापक,कलाशिक्षक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    तसेच विजेत्यांना स्मृतीचिन्ह,सन्मानपञ देऊन भव्य सत्कार सोहळ्यात गौरविण्यात आले. विद्यार्थी वर्गास कार्यक्रम संपल्यानंतर शेजारी असणा-या सायन्स पार्कचा,सौरमंडल,विज्ञान गार्डनाला भेटण्याचा आनंद घेतला.सायन्सच्या वेगळ्या दुनियेत जाण्याचा आनंद ही मिळाला.कार्यक्रमाचे बहारदार सूञसंचालन सौ.रुपाली भालेराव यांनी केले.कार्यक्रमाच्या संयोजनात मोहन कुदळे,यशवंत घोडे,सौ.रुपाली भालेराव,भाऊसाहेब आढाव,बबन चव्हाण,दिव्या भोसले,योगिता कोठेकर,प्रा.दिलीप गोरे,शशिकांत जाधव इ.पुढाकार घेतला.या कार्यक्रमाचे आयोजन व संयोजन कवी वादळकार,पुणेप्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे.अध्यक्ष साई कला आविष्कार नाट्य संस्था,भोसरी,पुणे  उत्तरित्या केले. विश्वगीत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.हा सलग चार तासांचा सोहळा रंगला होता.