भव्य टेनिस बॉल क्रिकेट चे उद्घाटन



प्रतिनिधी  :- मारुती जिंके

 कंधार (दि.29एप्रिल).तालुक्यातील   कंधारेवाडी या गावात स्व. तुकाराम विश्वनाथ जिंनके यांच्या स्मरणात अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आली आहे.

    कंधारेवाडी या गावात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची उद्घाटन कंधारेवाडी चे सरपंच डिगोळे यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित गावातील तरुण मित्रमंडळी फौजी शिवानंद कंधारे, रामेश्वर डिगोळे, म. सु. ब. नागनाथ डिगोळे, पत्रकार मारुती जिंके, माऊली डिगोळे, गणेश कंधारे, नागनाथ जिनके, चिकू कंधारे, कृष्णा केंद्रे, दत्ता डिगोळे उपस्थित होते.

    टेनिस बॉल चे प्रथम पारितोषिक भारतीय जनता पार्टीचे माननीय श्री एकनाथ दादा पवार यांच्या हस्ते 21111 रुपये द्वितीय पारितोषिक सोपान विश्वनाथ जिनके 11111 व तृतीय पारितोषिक 3333 रुपये असे ठेवण्यात आले आहे.