सटाणा प्रतिनिधी | आकाश साळुंके
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100 व्या मन की बात कार्यक्रम दि.30 एप्रिल रोजी संपन्न होत असूनमन की बात हा नुसता कार्यक्रम नाही तर पंतप्रधान मोदी यांनी रचलेला एक नवा इतिहास आहे. संवादातून सशक्त देश कसा उभारायचा याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. येत्या ३० तारखेला मन की बात चा १०० वा कार्यक्रम आहे.
सनपा चे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या संकल्पनेणे पाठक मैदान येथे दहा हजार स्क्वेअर फुटांची मोदीजी ची प्रतिकृती रांगोळी च्या साहाय्याने नुकतीच साकारण्यात आली आहे या रांगोळी साठी सुमारे तीन हजार शंभर किलो रांगोळी चा वापर करण्यात आला असून कलाशिक्षक दिगंबर आहिरे यांनी साकारली आहे यात विविध प्रकारचे विभिन्न रंग यात घेण्यात आले आहेत याचे आणावरन दि.29 एप्रिल रोजी सायं.5 वाजता करण्यात आले याप्रसंगी आमदार दिलीप बोरसे,भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश निकम,संघटन सरचिटणीस देवा पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील मोरे,संघाचे प्रदीप आबा बच्छाव किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा, सरपंच परिषद अध्यक्ष संदीप पवार,महेश देवरे, सरपंच लखन पवार ,नाना मोरकर,भावसींग पवार,महेंद्र पवार,किरण नांद्रे,पप्पु पाटील ई.मान्यवर नगरसेवक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते