दै..कर्णधार प्रतिनिधी सलमान मुल्ला
धाराशिव :-आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आल्याच्या संशयावरून एका 22 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्यातील मौजे टाकळी येथील सुधाकर शहाजी चौरे वय २२ वर्ष हा शेजारच्या विष्णु कमलपुरे यांच्या शेतात दुपारी खोंड बघायला गेला तो परत आलाच नाही त्याचा शोध घेतला असता सुधाकरचा खून झाल्याची बातमी मिळाली. सुधाकर खोंड बघुन घराकडे येत असताना गणेश युवराज सोनटक्के वय ३२ वर्ष रा. टाकळी (बेंबळी.) ता.जि धाराशिव याने वाटेत आडवले.गणेश सोनटक्के यानं सुधाकर चौरे यास काकासाहेब पाटील यांच्या उसाच्या शेताजवळ कोयत्याने वार करत ठार केले.या घटनेच्या ठिकानापासून अवघ्या 30 ते 40 फुटाच्या अंतरावर काही महिला शेतात काम करत होत्या. पण त्यांना या घटनेचा पत्ता लागला नाही.
सुधाकरचे वडील शहाजी वसंत चौरे वय ४८ वर्ष रा. टाकळी (बें) ता. जि. धाराशिव यांच्या फिर्यादीवरुन गणेश युवराज सोनटक्के वय ३२ वर्ष रा. टाकळी (बेंबळी ) ता.जि उस्मानाबाद यांच्या विरुध्द बेंबळी पोलीस स्टेशनला कलम ३०२,५०६ भारतीय दंड विधान संहिते नुसार गुन्हा दाखल झाला आहे.