*प्रतिनिधी : .गणेश ठाकरे लासलगाव*
नांदूर मधमेश्वर येथील शिंदे वस्ती शाळा येथे ७ मे २०२६, गुरुवार रोजी भगवान बिरसा मुंडा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर आणि बिस्किटांचे वाटप करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने संस्थेच्या सर्व संचालक मंडळाचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. हरिश्चंद्र भवर आणि मा. श्री. रमेश माळी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. संस्थेचे अध्यक्ष भाऊराव पवार यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, तर खजिनदार व सह-खजिनदार यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.याप्रसंगी संस्थेचे सचिव रतन सोनवणे, खजिनदार जगदीश बागुल, सह-खजिनदार वैभव सोनवणे, संचालक दिपक माळी,. सागर माळी, लहानू आंबेकर, . संजय मोरे, रत्नाताई बहिरम , मनीषा बडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सभासद गोरक माळी, नवनाथ जिरे, नाना सोनवणे आणि निफाड येथील कार्यकर्ते. प्रकाश बर्डे व रमेश मोरे हे देखील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण भंडारे सौ. भंडारे मॅडम, अनिता माळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद माळी, सदस्य सचिन पवार, शरद पवार, योगेश आहेर, राजू मोरे, भावराव पिंपळे व पालक वर्गाने विशेष परिश्रम घेतले.
