प्रतिनिधी . गणेश ठाकरे लासलगाव
महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन सोहळा गुरुवार, दि.१ मे २०२६ रोजी तहसील कार्यालय, निफाड येथे उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती निफाडचे तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली. तहसील कार्यालयाच्या आस्थापनेवरील विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तालुकास्तरावर निवड करण्यात आली असून निफाडचे आमदार दिलीपकाका बनकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
सन्मानार्थीमध्ये पुरवठा निरीक्षण अधिकारी अतुल गायकवाड, सहायक महसूल अधिकारी मारुती ठाकरे, महाराजस्व अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांमध्ये चांदोरी, सायखेडा, रानवड, पालखेड, नांदूरमधमेश्वर, देवगाव, विंचूर आणि लासलगाव येथील मंडळ अधिकारी, ग्रामअधिकारी गोरक्षनाथ दाते (मुखेड) आणि ईश्वरी देशमुख (पिंपळगाव नजीक), महसूल सहाय्यक (फौजदारी) ललित खैरे, बूथस्तरीय अधिकारी गोकुळ शेलार (सोनगाव) व बाळकृष्ण शिंदे (शिंगवे), प्राथमिक शिक्षक मुकेश सोनवणे व प्रमोद चव्हाण, पोलीस पाटील भाग्यश्री श्रीराम बोरसे (शिवडी), शिपाई दामोदर पगारे, महसूल सेवक श्रीमती ताई अहिरे (पिंपळगाव बसवंत), पीकपाणी सहाय्यक राजेश चव्हाण (गोंडेगाव) व ऋषिकेश चकोर (खानगाव थडी), संगायो
ऑपरेटर श्रीमती सारिका कोल्हे, जनगणना कक्षाचे रवींद्र पडोळ, पुरवठा शाखेच्या श्रीमती सविता काळे, निवडणूक शाखेचे संदीप खालकर आणि आपले सरकार सेवा केंद्राचे राहुल बरकले (कसबे सुकेणे) यांचा समावेश आहे.
• तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्ठेचा आणि कर्तृत्वाचा महाराष्ट्र दिनी सन्मान या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा प्रशासनातील कार्यतत्परता, सचोटी आणि लोकाभिमुख सेवेला सलाम करणारा ठरणार आहे. सन्मानार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेने विभागाची प्रतिमा उंचावली असून, त्यांच्या कार्याचा गौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.- विशाल नाईकवाडे तहसीलदार, निफाड
