माहूर येथे मंजुनाथ पेट्रोल पंप येथे पेट्रोल व डिझेलचा काळाबाजार

 



माहूर (प्रतिनिधी) प्रवीण बरडे 

सध्या सुरू असलेल्या अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमध्ये होत असलेल्या एलपीजी गॅस व पेट्रोल डिझेल च्या तुटवड्यामुळे संपूर्ण भारत होरपळून गेलेला असल्यामुळे भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात पेट्रोल पंप धारकांना सर्व माननीय जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिलेले आहे की मोपेड मोटार सायकल यांना प्रत्येकी 200 रु. तर मोटार वाहन यांना 1500 रु. अशाप्रकारे सर्व पेट्रोल पंपधारकांना निकष ठरवून दिले जेणेकरून सर्वांना पेट्रोल व डिझेल मिळावे आणि तुटवडा होऊ नये आणि डबकी मध्ये पेट्रोल व डिझेल देण्यास मनाई केलेली असताना माहूर मधील मंजुनाथ पेट्रोल पंप भारत पेट्रोलियम या पंप चालकाने दिनांक 2 एप्रिल रोजी रात्री 11:00 दरम्यान लाईट बंद करून पेट्रोल पंपधारकाने खुलेआम मोठ्या बॅरेल मध्ये ज्यादा दरात पेट्रोल व डिझेलची विक्री केली पेट्रोल डिझेलचा काळाबाजार करताना दिसून आला असून त्या पेट्रोल पंपधारकावर तहसील प्रशासनाने उचित कार्यवाही करावे असे जनतेचे मत आहे.


Tags