मिशन वात्सल्य' तालुका समितीवर मनोज किर्तने व प्रल्हाद चव्हाण यांची अशासकीय सदस्य पदी निवड

 



  माहुर प्रतिनिधी प्रवीण बरडे 

   कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेली अनाथ बालके आणि घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या विधवा तसेच घटस्फोटित व परीतक्त्या महिलांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने 'मिशन वात्सल्य' योजना सुरू केली आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी माहूर तालुका स्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून सामाजिक कार्यकर्ता, साऊ एकल महिला समिती माहुर तालुका समन्वयक तथा पत्रकार मनोज मुकुंदा किर्तने आणि प्रल्हाद सेवाजी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समिती सचिव असलेले,बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प माहूर यांनी १७ मार्च २०२६ रोजी हे अधिकृत नियुक्ती पत्र निर्गमित केले.

    ही समिती तालुक्यात अनाथ मुले आणि एकल महिलांचा शोध घेऊन त्यांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी काम करेल. या समिती सर्व विभाग प्रमुख सदस्य असून,तहसीलदार या समितीचे अध्यक्ष आहेत.

१. तहसीलदार (अध्यक्ष)२. गट विकास अधिकारी (सदस्य)३. गट शिक्षण अधिकारी (सदस्य)४. तालुका विधी सेवा प्राधिकरण (सदस्य) ५. मुख्याधिकारी, नगर पंचायत (सदस्य)६. पोलीस निरीक्षक (सदस्य)७. तालुका आरोग्य अधिकारी (सदस्य)८. विस्तार अधिकारी, समाज कल्याण (सदस्य)९. तालुका कृषी अधिकारी (सदस्य)१०. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग (सदस्य)११. तालुका संरक्षण अधिकारी - कनिष्ठ (सदस्य)

१२. अशासकीय सदस्य (मनोज मुकुंदा किर्तने व प्रल्हाद सेवाजी चव्हाण)१३. बाल विकास प्रकल्प अधिकारी -(सदस्य सचिव) अशी तालुकास्तरीय समिती आहे.  समितीला शासनाच्या विविध २५ प्रकारच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन, शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र मिळवून देणे.आधार कार्ड, जन्म-मृत्यू दाखला आणि जातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि बालसंगोपन योजनेचा लाभ देणे.

  अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व फी माफी सुनिश्चित करणे.घरकुल योजना, कौशल्य विकास आणि अंत्योदय योजनेशी लाभार्थ्यांना जोडणे. एलआयसी किंवा विमा पॉलिसीचे लाभ मिळवून देण्यासाठी समन्वय साधणे.

      या निवडीबद्दल मनोज किर्तने व प्रल्हाद चव्हाण यांचे तहसीलदार अभिजित जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, नायब तहसीलदार अरुणाताई सूर्यवंशी, ज्योतिबा दादा खराटे,माजी नांदेड जी. प. उपाध्यक्ष समाधान जाधव,नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी अभिनंदन केले आहे.


"तालुक्यातील एकही पात्र महिला लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी आम्ही प्रशासकीय यंत्रणेसोबत पूर्ण क्षमतेने काम करू," प्रशासनाने व साऊ एकल महिला राज्य समिती समन्वयक मा. हेरंब कुलकर्णी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवून, सामाजिक व संवेदनशील जाणिवेतून वंचित व दुर्लक्षित असलेल्या या विभागासाठी चेतनादायी उत्स्फूर्त कार्य करू.-   : मनोज किर्तने :नवनिर्वाचित,अशासकीय सदस्य. तथा तालुका समन्वयक,साऊ एकल महिला समिती माहुर.