प्रतिनिधी :- गणेश ठाकरे लासलगाव
लासलगाव येथील परमपूज्य भगरी बाबा आधार फाउंडेशन यांना मिळालेल्या कंपनी सामाजिक दायित्व निधीतून अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण लासलगावचे स.पो.नि दिपक पाटील व आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकार्पण प्रसंगी मुंबई बाजार समिती संचालक जयदत्त होळकर, मा.आ.कल्याणराव पाटील, पंढरीनाथ थोरे, प्रकाश दायमा, संतोष पलोड, गुणवंत होळकर, शंतनु पाटील, व्यापारी व डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
समाजोपयोगी उपक्रम म्हणून रुग्णांना तात्काळ व दर्जेदार सेवा मिळावी या उद्देशाने ही अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेत दाखल करण्यात आली आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा आधार मिळणार असल्याचे मत व्यक्त केले. जयदत्त होळकर यांनी बाजार समितीच्या माध्यमातून रुग्णवाहिकेसाठी लागणाऱ्या चालकासंदर्भात संचालक मंडळाचे चर्चा करून तोही प्रश्न शंभर टक्के मार्गी लावू असे आश्वासित केले. प्रकाश दायमा यांनी नामको बँकेच्या माध्यमातून भगरीबाबा मंदिर तसेच भगरी बाबा फाउंडेशनला भरघोस मदत करण्याचे आश्वासन दिले. सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नातून भगरीबाबा फाउंडेशनला मोलाचे मदत लाभले त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
