लासलगाव शहरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांचे होणार आयोजन



प्रतिनिधी |गणेश ठाकरे लासलगाव 

    शहरात दरवर्षीप्रमाणे यंदा २६ मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. श्रीराम नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  गुरुवार दि. २६ रोजी श्रीराम मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने राम मंदिरामध्ये ‌ सकाळी १०  वाजता ह भ प ‌ भास्कर महाराज रसाळ यांचे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य कीर्तन सोहळा आयोजित केला आहे. सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने सायंकाळी ४ ते ५ या वेळेत श्री हनुमान चालीसा पाठ कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता  आरती व प्रसाद वाटप तर सायंकाळी ५ वाजता स्टेशन रोड बस आगारांमधील श्री बाबा अमरनाथ मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे. धर्मवीर मर्दानी खेळ व शिवकालीन प्रशिक्षण केंद्र वेळापूर यांचे पथक सहभागी होणार आहे.यामध्ये महिला तसेच पुरुषांची उपस्थिती मोठ्या संख्येने राहणार आहे. लासलगाव परिसरातील अनेक ५०० पेक्षा अधिक वारकरी असलेले भजनी मंडळ या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.

      सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीराम गीतांचा स्वरस्पंदन ऑर्केस्ट्रा संपन्न होणार आहे.रात्री ८ वाजता झेंडा चौक या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून लासलगाव व परिसरातील नागरिकांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.