माहूर प्रतिनिधी प्रवीण बरडे
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ संचलित निर्भय समाजकार्य माहूर तालुका अध्यक्ष पदी कुंदन निवडकर यांची निवड दिनांक 17 फेब्रुवारी रोजी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या संमतीने बिनविरोध निवड झाली असून त्यांना पुढील वाटचालीसाठी संपूर्ण माहूरगड तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
माहूर तालुक्यातील होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध समाजकार्य म्हणजे समाजातील व्यक्ती, कुटुंब, गट किंवा समुदायाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी केलेली व्यावसायिक आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेली मदत. हे एक सामाजिक विज्ञान आहे जे लोकांच्या कल्याणासाठी कार्य करते.
समाजकार्याचे मुख्य उद्दिष्टे:- लोकांच्या समस्या सोडवण्यास मदत करणे,त्यांच्या क्षमता विकसित करणे, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे. म्हणूनच संघटनेने त्यांची तळमळ पाहून त्यांच्यावर नवीन जबाबदारी दिलेले आहे.
