शेळगाव येथे नागरी सुविधांच्या कामांना वेगवान सुरुवात

 


किरण माने इंदापूर प्रतिनिधी 

       शेळगाव : माजी राज्यमंत्री आणि इंदापूर  तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून नागरी सुविधा योजनेअंतर्गत वैदुवाडी तसेच जैन मंदिर येथे मंजूर झालेल्या सिमेंट काँक्रिटीकरण  रस्त्याच्या कामांचा शुभारंभ (१४) रोजी करण्यात आला. वरील दोन रस्त्यासाठी सुमारे वीस लाख रुपये निधी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मिळाला आहे. ग्रामविकासाच्या कामासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.उर्मिला लक्ष्मणराव शिंगाडे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जगताप आणि ग्रामपंचायत चे सर्व सदस्य हे ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत चालू असलेल्या विविध  कामावरती ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.

     यावेळी ज्येष्ठ नागरिक चंदूकाका दोशी,छत्रपती साखर कारखान्याचे संचालक ॲड.लक्ष्मणराव शिंगाडे, उपसरपंच रेश्मा जाधव, माजी सरपंच रामदास शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रताप चवरे,ॲड बापूराव शिंगाडे, प्रशांत भुजबळ, मोहन खराडे,मनोहर शिंगाडे, रसूल शिंदे,मिलिंद जाधव, विलास भांगे,आयुब सय्यद,सुभाष काळे, भिवा जाधव, विठ्ठल शिंगाडे, हिरालाल ननवरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.