नवी दिल्ली : १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला बुधवारी २२ वर्षे झाली. शहीदांना आदरांजली वाहून संसदेचे कामकाज सुरू झाले आणि संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभेत आज अचानक गोंधळ झाला. शुन्य प्रहारात खासदार त्यांचं म्हणणं मांडत असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी लोकसभेच्या सभागृहात उड्या मारल्या. दोघेही खासदारांच्या बाकावरून लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. याचवेळी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या स्मोक कॅनमधून पिवळ्या रंगाचा धूर सोडला. यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला.
या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, या घटनेत पोलिसांनी आतापर्यंत चौघांना ताब्यात घेतलं आहे. संसदेत राडा करणारे दोन जण आणि संसदेबाहेर घोषणा देणारे दोन (एका महिलेसह) असे मिळून चार जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. संसदेत राडा करणाऱ्या दोन तरुणांची नावं सागर शर्मा आणि डी. मनोरंजन (३५) अशी आहेत. तर संसदेबाहेर नीलम (४२) आणि अमोल शिंदे (२५) या दोघांना पोलिसांनी पकडलं. संसदेबाहेर नीलम आणि अमोल शिंदे या दोघांनी “तानाशाही नहीं चलेगी (हुकुमशाही चालणार नाही), मणिपूरवासियांना न्याय द्या. महिलांवरील अत्याचार सहन करणार नाही. भारत माता की जय, हुकुमशाही बंद करा. जय भीम, जय भारत, वंदे मातरम.” अशा घोषणा दिल्या होत्या
या घटनेप्रकरणी चौघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. खासदार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी सागर आणि मनोरंजन यांना चोप दिला आहे. हा प्रकार त्यांनी कोणत्या उद्देशाने केला याची चौकशी केली जाईल. या घोषणाबाजीत मणिपूरचा उल्लेख असल्याने त्यादृष्टीनेही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा हेसुद्धा घटनेनंतर संसदेत दाखल झाले आहेत. ते स्वतः याप्रकरणी चौकशी करत आहेत.
सोशल मीडियावर ओळख, मग हल्ल्याचा कट
चार आरोपी एकमेकांना ओळखतात. है चौघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना भेटले, त्यानंतर त्यांनी संसदेवर हल्ल्याची योजना आखली, या आरोपींना आश्रय देणाऱ्या विकी शर्मा व त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली. ललित झा घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
खासदारांच्या पीएचे पास रद्द
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेबाबत अनेक बैठका घेतल्या व संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला, त्यांनी प्रेक्षक गॅलरीवे सर्व पास रह केले, सर्व विद्यमान व माजी खासदारांच्या पीएचे पासही रह केले. विधिमंडळाचा पास देण्यावर निर्बंधनागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाया प्रवेश पत्रिकेवर निर्बंध आणण्यात आले आहेत. यापुढे आमदारांना केवळ दोनच पास दिले जातील. अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली