प्रतिनिधी रावसाहेब पगार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी,ता.इगतपुरी,जि.नाशिक येथील शाळेत नायकडा फाऊंडेशनच्या अध्यक्षा बबिता घोती यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त वाकी शाळेत सोनपापडीआणि फरसाणचे उपस्थित मुलांना वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक रवींद्र पाटील,केंद्रप्रमुख रामकृष्ण पाटील,विद्या पाटील,मनिषा उनवणे,आणि अध्यक्ष बबिता घोती,मनिषा चौधरीउपस्थित होत्या मुलांना खाऊ मिळाल्यामुळे मुले आनंदीत झाली यावेळी शाळेच्या भौतिक व शैक्षणिक सुविधा बाबत अध्यक्षा बबिता घोती यांनी मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांच्याशी चर्चा केली भविष्यात फाऊंडेशन सुविधा उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत काय सुधारणा करता येईल वआदिवासी भागातील शाळांना मदत करणेकामी भविष्यात आढावा घेऊन मदत केली जाईल
यावेळी मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनीही फाऊंडेशनच्या कामाविषयी मनोगत व्यक्त केले तसेच परिसरातील पिंपळगाव भटाटा ,डहाळेवाडी,तेलमवाडी,बिर्टुली, धार्नोली, शिंदेवाडी ,गांगडवाडी भरवज निरपण काळुस्ते ठाकुरवाडी दरेवाडी येथील शाळांसह परिसरातील अंगणवाडीतील एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली यावेळी शाळेच्या वतीने बबिता घोती आणि मनिषा चौधरी यांचा चा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रवींद्र पाटील यांनी केले.आभारप्रदर्शन रामकृष्ण पाटील यांनी केले. शाळेतील विद्या पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी अहिरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र परदेशी,उपाध्यक्ष बाजीराव धारे,नवनाथ काळे ,ईश्वर डोळस,यांनी कौतुक केले.