पळशी सुपो येथील 45 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव जा.प्रतिनिधी:- योगेश म्ह्साळ

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गोराळा धरण येथे नाग दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजे दरम्यान मच्छीमारी करणाऱ्या नागरिकांना  एक इसम कडू बदामच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. घटनेची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित हे घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची तपासणी करीत असताना खिशामध्ये मोबाईल आढळून आल्याने त्यावरून मृतक इसमाची ओळख पटली सदर मृतक व्यक्ती हा सुपो ट्रॅव्हल एजन्सी द्वारे तिकीट बुकिंग करीत होता.मृतकाचे नाव लक्ष्मण हरिभाऊ कोकाटे राहणार पळशी सुपो येथील असून तो सध्या जळगाव जामोद येथील पाटील नगर मध्ये राहत होता. दिनांक 19 ऑगस्ट रोजी तिकीट बुकिंग चे दुकान वर जातो असे सांगून घरून निघून गेल्याने घरी परत आला नाही. अशा आशयाची तक्रार मृतकाचा भाऊ रामभाऊ हरीभाऊ कोकाटे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला मर्ग क्रमांक 54/2023 कलम 174 जाफौ नुसार दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनात नापोकॉ उमेश शेगोकार करीत आहेत.