दि. 31 जुलै रोजी खामगाव येथे भीमा कोरेगाव दंगली मधील मुख्य आरोपी असलेले व जातीवादी तेढ निर्माण करणारे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याची घाटपुरी बायपास श्रीधर महाराज मंगल कार्यालय या ठिकाणी सभा होत असून त्या सभेची परवानगी प्रशासनाने रद्द करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव यांच्याशी 28 जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोकभाऊ सोनोने, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी चर्चा करून निवेदन दिले
सदरच्या निवेदनात नमूद आहे की संभाजी भिडे हे गेल्या सात वर्षापासून समाजात तेढ निर्माण करणारे व जातीयवादी तसेच देश विरोधी वक्तव्य करीत आहेत तसेच भीमा कोरेगाव प्रकरण घडवण्यामध्ये मुख्य आरोपी असून ते वादग्रस्त आहेत त्यामुळे खामगाव, बुलढाणा जिल्हा शांतताप्रिय आहे येथे सर्व बहुजन गुन्यागोविंदाने राहत आहेत त्यामुळे वादग्रस्त असलेले संभाजी भिडे यांची सभा झाल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता आहे तरी संभाजी भिडे यांची सभा होणार नाही त्याकरीता प्रशासनाने या सभेला परवानगी देऊ नये दिल्यास संभाजी भिडेची सभा झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला आहे याप्रसंगी पार्लमेंटरी बोर्ड सदस्य अशोकभाऊ सोनोने, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकर, बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे, जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, खामगाव कृषी ऊ.बा.समिती उपसभापती संघपालभाऊ जाधव, तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे, प्रकाशभाऊ दांडगे यांची उपस्थिती होती.