बुलढाणा, 25 जुलै
मलकापूर बुलढाणा कडे येणारी एसटी बस राजुर घाटात पलटी झाल्याचे वृत्त आहे. मोहेगाव फाट्याजवळ झालेल्या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. बस क्रमांक 83 75 चा जॉईंटर निसटला आणि बस मागे मागे जाऊ लागली. दरम्यान ब्रेक दाबत असताना एसटी बस पलटी झाली, अशी प्राथमिक माहिती बुलढाणा आगाराकडून बुलडाणा गर्जना ला मिळाली आहे. बस मध्ये 55 प्रवासी असल्याचे कळते.