सम्मेद शिखरजी यात्रेतील भाविकांना आयकार्ड वितरण प्रसंगी राजगोंडा पाटील, धीरज मगदूम, कुमार पाटील व इतर



सम्मेद शिखरजी दर्शनाने मोक्ष प्राप्त होतो
डॉक्टर अंकित उपाध्ये : यात्रा बैठक संपन्न
कोगनोळी, ता. 14 : ग्राम पंचायत सदस्य राजगोंडा टोपान पाटील यांच्यावतीने गतवर्षी 130 भाविकांना तर चालू वर्षी 160 लोकांना सम्मेद शिखरजी मोफत यात्रेचे आयोजन केले आहे. धार्मिक काम करणाऱ्या राजगोंडा पाटील यांचे काम कौतुकास्पद आहे. सम्मेद शिखरजी यात्रेला जाऊन चार दर्शन, पाच दर्शन करण्यापेक्षा एकच दर्शन भक्तिभावाने केल्यास मोक्ष प्राप्त होतो. असे मनोगत डॉक्टर अंकित उपाध्ये यांनी केले.
कोगनोळी तालुका निपाणी येथे सम्मेद शिखरजी यात्रा नियोजन बैठकीत बोलत होते.
अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत सदस्य राजगोंडा पाटील होते.
सैनिक शाळेचे सचिव कुमार पाटील यांनी स्वागत तर धीरज मगदूम यांनी प्रास्ताविकात सम्मेद शिखरजी यात्रेबद्दल माहिती दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यात्रेला येणाऱ्या भाविकांना पूजेचे साहित्य व आयकार्ड वितरण केले.
कुमार पाटील यांनी पंधरा दिवस असणाऱ्या प्रवासामध्ये प्रवाशांनी घेण्याचे साहित्य, रोज लागणारी औषधे, त्याचबरोबर रेल्वे प्रवास, बस प्रवास, यात्रेदरम्यान मुक्काम, भोजन व्यवस्था याबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी सुरेखा पाटील, बाबुराव पाटील, मदनाका पाटील, स्नेहा पाटील, रेखा पाटील, ज्योती मगदूम, सारिका चिंचणे, शर्मिला पाटील, मनीषा पाटील, अभिजीत पाटील, एल डी चौगुले, प्रवीण पाटील, नरसु पाटील, अशोक वंदुरे, अक्षय वंदुरे, एस एन अलगुरे, धनंजय मोनाप, अनुसया यादव, मंगल करनुरे, भोपाल चौगुले, सचिन जाधव, संतोष चिंचणे, महावीर चिंचणे, जितेंद्र चिंचणे, वैभव चौगुले, सचिन चौगुले, प्रमोद चौगुले, शितल चौगुले, पोपट मांजरीकर, ऋषिकेश पाटील, उत्कर्ष पाटील यांच्यासह अन्य भाविक भक्त उपस्थित होते.
अनिल पाटील यांनी आभार मानले.