प्रशासकीय सेवेतील सर्व पदे एम.एड. या शैक्षणिक पात्रतेतून भरण्यात यावी मंत्रालय स्तरावर निवेदन



प्रतिनिधी --- श्री रावसाहेब पगार नाशिक

दिनांक 3 मे 2023 व 4 मे 2023 या दोन दिवस महाराष्ट्र राज्य एम एड.कृति समितीचे  राज्य सरचिटणीस श्री. प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, पुणे विभागीय अध्यक्ष भीमराव पाटील,मार्गदर्शक नागो वीरकर, रायगड जिल्हा अध्यक्ष बिपिन साळवे ,नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गीते आदींच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात माननीय शिक्षणमंत्री, अव्वर सचिव,उपसचिव, शालेय शिक्षण सचिव, यांची भेट घेऊन राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभाग मधील केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी ही रिक्त पदे उच्च शैक्षणिक पात्रता धारक प्राथमिक शिक्षक संवर्गातून तात्काळ भरावीत या मागण्यांसाठी  निवेदन देऊन भेटी घेतल्या. ... 

राज्यातील शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदी पर्यवेक्षकीय यंत्रणेतील जवळपास 80 टक्के पदे रिक्त आहेत.. राज्यातील काही जिल्हा परिषद मध्ये अनेक वर्षापासून पदोन्नती प्रक्रिया झालेली नाही, सर्वच ठिकाणी या पदांवर प्रभारी म्हणून कामकाज सुरू आहे. त्यामुळे अनेक शिक्षक पदोन्नती पासून वंचित राहिलेले आहेत .त्याचा परिणाम विद्यार्थी सर्वांगीण गुणवत्तेवर, प्रशासन नियोजन व सनियंत्रण यावर दिसून येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 एड.कृतीआराखड्यात उच्च शैक्षणिक पात्रता धारक जिल्हा परिषद शिक्षक यांना प्रशासकीय सेवेत सामावून घ्यावे, बढती, वेतन वाढ, पदोन्नती इत्यादी सेवा संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात .अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार उच्च शैक्षणिक पात्रता धारकांना मोठ्या प्रमाणात शिक्षण विभागातील रिक्त केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी  आदी पदांवर पुढील प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होईपर्यंत अभावीत (तात्पुरत्या) स्वरूपात सामावून घ्यावे, याचा तिजोरीवर कोणताही आर्थिक परिणाम होणार नाही .शिवाय वरील पदे भरल्यामुळे शिक्षकांची पदे देखील रिक्त होतील .तसेच सध्या आपल्या विभागामध्ये उच्च शैक्षणिक पात्रताधारक अनेक प्राथमिक शिक्षक असून त्यांना पदोन्नतीच्या संधी पासून वंचित राहावे लागत आहे. 

तरी सदर शिक्षकांच्या गुणवत्तेचा यासाठी विचार करावा आणि जिल्हा परिषद मधील एम . एड. प्राथमिक शिक्षक यांना अधिकारी होण्याची संधी प्राप्त करून देण्यासाठी महाराष्ट्र सेवा शर्ती नियमावली 1967 मध्ये दुरुस्ती करून इतर विभागाप्रमाणे कार्यवाही करावी. अशी आग्रही मागणी यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात   मुख्यमंत्री,शालेय शिक्षण मंत्री ,ग्राम विकास मंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच ग्रामविकास व शालेय शिक्षण सचिव यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे. यावेळी माननीय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब यांची शिष्टमंडळाने भेट घेतली असता लवकरच वरील प्रमाणे केंद्रप्रमुख भरतीची प्रक्रिया करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ग्रामविकास उपसचिव,जिल्हा परिषद आस्थापना मा. श्री. पी. डी. देशमुख साहेब यांनी शिष्टमंडळाला सविस्तर वेळ देऊन  समाधानकारक चर्चा केली आणि याविषयी  तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले  महाराष्ट्र राज्य एम एड. प्राथमिक शिक्षक कृती समितीच्या वतीने मंत्रालयातील ग्रामविकास उपसचिव पी डी  देशमुख  यांना केंद्रप्रमुख , विस्तार अधिकारी पदी नियुक्ती करणे बाबत निवेदन देताना कृती समितीचे राज्य सरचिटणीस प्रदीप शिंदे, भीमराव पाटील, बिपिन साळवे ,नागो विरकर ,संदीप गीते आदी.*